मुंबई विद्यापीठानं एलएलएम प्रवेश परीक्षेची मुदत वाढविण्याची मागणी !-Extend LLM Deadline!

Extend LLM Deadline!

मुंबई विद्यापीठानं एलएलएम म्हणजेच पदव्युत्तर कायद्याचं शिक्षण घ्यायचं असेल, तर त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. हे अर्ज २६ ऑगस्टपासून भरायला सुरुवात झाली. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३ सप्टेंबर ठेवण्यात आली होती.

Extend LLM Deadline!पण सध्या गावाकडं गणपतीचा उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू आहे. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपापल्या गावी जायचं ठरवलंय.

या गणेशोत्सवामुळे अनेक विद्यार्थी सध्या घरीच आहेत आणि त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रं नाहीत. काही जणांना ती काढायलाही अडचणी येत आहेत – जसं इंटरनेटचा अभाव, सायबर कॅफे बंद असणं, किंवा गरजेची कागदपत्रं शहरातच राहिलेली असणं. अशा वेळी, अर्ज भरणं कठीण होऊन बसलंय.

ही अडचण लक्षात घेता, काही विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य मिळून विद्यापीठाकडे एक विनंती केली आहे की अर्ज भरण्याची तारीख किमान ३ दिवस तरी वाढवण्यात यावी. म्हणजे सण साजरा करून परत आलेले विद्यार्थीही वेळेत अर्ज भरू शकतील आणि कुणाचंही नुकसान होणार नाही.

या एलएलएम अभ्यासक्रमासाठी जी प्रवेश परीक्षा होणार आहे, ती पूर्णपणे ऑनलाइन “CBT” म्हणजेच Computer Based Test पद्धतीनं घेतली जाणार आहे. परीक्षा, पात्रता, नोंदणी प्रक्रिया, फी आणि इतर सर्व माहितीसाठी विद्यापीठाने आपल्या अधिकृत वेबसाइटवर सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.

Comments are closed.