केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समन पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या भरतीत एकूण 1048 पदे भरण्यात येणार असून, त्यामध्ये 945 पदे पुरुषांसाठी आणि 103 पदे महिलांसाठी राखीव आहेत.
ही भरती महाराष्ट्रासह राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, गोवा, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश, केरळ, कर्नाटकम, तामिळनाडू, तेलंगणा, पुद्दुचेरी आणि इतर अनेक राज्यांमध्ये राबवली जाणार आहे.
भरती प्रक्रियेच्या सविस्तर माहितीसाठी उमेदवारांनी CISF च्या अधिकृत संकेतस्थळावर (cisfrectt.cisf.gov.in) भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक पात्रता, परीक्षा पद्धत आणि अर्ज प्रक्रियेची माहिती घेऊन लवकरात लवकर अर्ज करावा.