राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, आता महिलांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने त्यांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे दोन्ही हप्ते जमा करण्यात येणार आहेत. यामुळे महिलांना एकूण 3,000 रुपये मिळणार आहेत, ज्यामुळे लाखो महिलांना दिलासा मिळेल.
फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते मिळणार
फेब्रुवारीच्या हप्त्याच्या वाटपात पडताळणीमुळे काहीसा विलंब झाला. मात्र, आता 8 मार्च रोजी फेब्रुवारीचा हप्ता जमा होणार आहे. तसेच, मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर त्वरित खात्यात जमा केला जाणार आहे. त्यामुळे महिलांना एकाच वेळी दोन हप्ते मिळतील, अशी माहिती समोर आली आहे.
दोन कोटींहून अधिक महिलांना लाभ
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, सुमारे 2 कोटी 40 लाख महिलांपर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ पोहोचला आहे. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्तेही वेळेत दिले जातील. विरोधकांनी सुरुवातीपासून या योजनेवर टीका केली होती, मात्र महिलांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळे त्यांचे आरोप फोल ठरले आहेत.
योजना सातत्याने सुरू राहणार
महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना सक्षमपणे कार्यरत राहणार आहे. महिलांना मिळणारा आर्थिक लाभ पुढेही सुरूच राहील, असे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.