तुम्ही १० वी पास आहात आणि घरबसल्या काम शोधताय का? तर अमेझॉनने तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे. आता मोबाईल किंवा लॅपटॉपवरून घरबसल्या ऑनलाईन काम करत तुम्ही महिन्याला ₹35,000 पर्यंत सहज कमवू शकता.
अमेझॉन सध्या अकाउंट मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर, ऑपरेशन मॅनेजर, डिजिटल असोसिएट, कस्टमर सपोर्ट, ब्रँड सल्लागार आणि सिक्युरिटी एक्सपर्ट अशा विविध पदांसाठी भरती करत आहे.
या संधीसाठी पात्र होण्यासाठी तुमच्याकडे संगणक किंवा लॅपटॉप, चांगलं इंटरनेट कनेक्शन, मायक्रोफोन व हेडसेट (ऑनलाईन संवादासाठी), आणि कामासाठी शांत व वेगळी जागा (टेबल-खुर्चीसह) असावी. तुम्हाला इंग्रजी भाषेतील लेखन व संवादात चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये किमान १० वी पास असणं आवश्यक असून, काही पदांसाठी १२ वी, ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट-ग्रॅज्युएशन असणं देखील ग्राह्य धरलं जातं. उमेदवाराचं वय किमान १८ वर्ष असावं आणि पदानुसार कमाल वय ३५ ते ५८ वर्षांपर्यंत असू शकतं.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या संधीसाठी अर्ज पूर्णपणे मोफत आहे. कुणी अर्जासाठी पैसे मागत असेल, तर ती फसवणूक असू शकते, त्यामुळे सतर्क राहा. कामाची वेळ सोमवार ते रविवार शिफ्टनुसार असेल, सकाळी ६ ते रात्री ११ दरम्यान आणि काहीवेळा ओव्हरटाईमची गरज भासू शकते.
अर्ज करण्यासाठी, अमेझॉनची अधिकृत वेबसाइट amazon.in वर जाऊन ‘Career’ किंवा ‘Jobs’ या विभागात जावं. तिथं आपलं लोकेशन भरून, संबंधित नोकऱ्यांची यादी पाहून हवं ते काम निवडून अर्ज भरावा. अर्ज सादर केल्यानंतर अमेझॉनची टीम तुमच्याशी थेट संपर्क साधेल.
ही सुवर्णसंधी गमावू नका – घरबसल्या काम, स्थिर उत्पन्न आणि मोठ्या कंपनीसोबत काम करण्याचा मान!