फ्लिपकार्ट, अमेझॉनवर आता वस्तू रिप्लेसमेंटसाठी सेवा केंद्रात चकरा माराव्या लागणार!

0

अमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोनही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये बदल केला आहे. या कंपन्यांनी सात दिवसांत वस्तूंची देवाणघेवाण करण्याची योजना बंद केली आहे. याआधी या कंपन्यांकडून खराब झालेल्या किंवा सदोष वस्तू बदलून दिल्या जात होत्या. त्याऐवजी आता अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टने ग्राहकांना संबंधित प्रॉडक्टच्या सेवा केंद्रात जाण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजे एखादे प्रॉडक्ट तुम्ही विकत घेतले आणि त्यात काही दोष आढळला, तर तुम्हाला सेवा केंद्रात चकरा माराव्या लागणार आहेत.

ग्राहकांना यापुढे घरात बसून वस्तू आणि वस्तूंची देवाणघेवाण करण्याची सुविधा मिळणार नाही. अॅमेझॉनसह फ्लिपकार्टने हा नियम बदलल्याने ग्राहक सेवेवर मोठा परिणाम होणार आहे. उत्पादन कमी
दर्जाचे निघाले तर ग्राहकांना आर्थिक फटका बसणार आहे. कारण, सदोष वस्तू सात दिवसांत बदलून देण्याचे धोरण बदलले असून, या दोन्ही कपन्यांनी सात दिवसात सर्व्हिस सेंटरमध्ये वस्तू बदलण्याचा पर्याय दिला आहे. म्हणजे, या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर ‘७ डे रिप्लेसमेंट’मध्ये बदल करत ‘७ डेज सर्व्हिस सेंटर रिप्लेसमेंट’ (7 Days Center Replacement) असा बदल केला आहे.

आता अॅमेझॉन, फ्लिपकार्टवरून डिजिटल वस्तू, उत्पादने, स्मार्टफोन, स्मार्ट घड्याळे, इअरबड्स खरेदी करीत असाल तर त्या प्रॉडक्टशी संबंधित जवळच्या सर्व्हिस सेंटरची माहिती घेऊन ठेवा. उत्पादन सदोष असल्याचे निष्पन्न झाल्यास, ताबडतोब सेवा केंद्रात जाऊन त्याबद्दल तक्रार करू शकता आणि उत्पादन कधी मिळेल, याची माहिती मिळवू शकता. मात्र, या धोरणामुळे ग्राहकांचा वेळ तर जाणारच आहे, शिवाय नाहक मनस्तापही सहन करावा लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.