लाडक्या बहिणींवर कारवाई!-Action on ‘Beloved Sisters’!

Action on ‘Beloved Sisters’!

सरकारी ‘लाडकी बहीण’ योजनेतून लाभ घेणाऱ्या सुमारे १२ हजार महिला कर्मचाऱ्यांवर आता शिस्तभंगाची कारवाई होणार आहे.

Action on ‘Beloved Sisters’!महिला व बालकल्याण विभागाने माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने केलेल्या तपासणीत काही महिलांनी या योजनेचा गैरवापर केल्याचे समोर आले आहे. ही माहिती संबंधित विभागांना पाठवण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याचा उद्देश राज्याने महिलांना सशक्त करण्याचा आहे. मात्र, काही लाभार्थी बनावट असल्याचेही आढळले आहे. अगदी काही पुरुषांनीही हा लाभ घेतल्याचे लक्षात आले आहे. त्यातच काही सरकारी महिलांनी ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा गैरफायदा करून शासनाला फसवल्याचे निदर्शनास आले आहे.

यामुळे सरकारने कठोर कारवाईची तयारी सुरू केली असून, महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा परिषदांना दिले आहेत. पहिल्या टप्प्यात १,१८३ महिलांवर कारवाई होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Comments are closed.