नवीन अपडेट !! लाडकी बहीण योजनेचा तिसऱ्या बहिणीला लाभ नाही मिळणार !

3rd Sister Dropped!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेखाली एकाच कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ द्यायचं ठरलेलं असतानाही, काही घरांमधून तिसऱ्या-चौथ्या महिलांनी अर्ज करून लाभ घेतला. काहींनी रेशनकार्ड वेगळं दाखवलं, काहींनी वय १८ नसतानाही ते पूर्ण झालंय असं दाखवलं.

3rd Sister Dropped!आता शासनानं ‘FSC Multiple in Family’ अशी टिपणी त्या नावासमोर लावून लाभ थांबवलेत. ऑगस्टपासून उत्पन्नाची चाचणी सुरू होणार असून, ज्यांचं कुटुंब उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त आहे, अशा महिलांना योजनेतून वगळलं जाणार.

अशा महिलांचा लाभ बंद:

  • ज्यांचं वय ६५ वर्षांपेक्षा जास्त

  • ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे

  • संजय गांधी योजनेसह दुसऱ्या वैयक्तिक योजना लाभार्थी

  • ज्यांनी वय आणि माहिती चुकीची दिली

राज्यात सुमारे २ कोटी ५७ लाख महिलांनी अर्ज केलेत. पण त्यात काही अर्ज अपात्र ठरलेत, म्हणून आता शासनाने आयकर खात्याच्या माहितीच्या आधारावर महिला व बालविकास विभागाकडून थेट पडताळणी सुरू केली आहे.

ज्यांचा लाभ बंद झालाय, त्या आता संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करत असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

Comments are closed.