१५,६३१ पोलीस जागांना मंजुरी!-15,631 Police Posts Approved!

15,631 Police Posts Approved!

मोठी खबरी आईका! राज्य सरकारच्या गृह खात्यानं पोलीस विभागात आणि जेल खात्यात मोकळ्या पडलेल्या १५,६३१ जागांसाठी भरती मंजूर केली हाय. ह्याचं जी.आर. २० ऑगस्ट २०२५ रोजी काढला गेला.

15,631 Police Posts Approved!ही बातमी ऐकून पोलीस भरतीची वाट पाहत असलेला युवक वर्ग एकदम खुश झालाय, आता लवकरच प्रक्रिया सुरु व्हायची शक्यता हाय.

मुख्य मुद्दे काय म्हणत्यात?

१२ ऑगस्टच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ह्या भरतीला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यावरून गृह खात्यानं निर्णय घेतला, आणि खालील पदं भरली जाणार हायत:

  • पोलीस शिपाई – १२,३९९

  • पोलीस शिपाई चालक – २३४

  • बॅण्डस्मन – २५

  • सशस्त्र पोलीस शिपाई – २,३९३

  • कारागृह शिपाई – ५८०

एकूण: १५,६३१ जागा!

ही सगळी पदं १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२५ या काळात रिकामी झालेली किंवा होणारी आहेत.

Comments are closed.