लाडक्या बहिणींना ४५००चा दिलासा!-₹4,500 Relief for Ladki Bahin!

₹4,500 Relief for Ladki Bahin!

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ई-KYC प्रक्रियेमुळे थकलेले नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात थेट ४,५०० रुपये जमा होणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे.

₹4,500 Relief for Ladki Bahin!राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र, ई-KYC पूर्ण न झाल्याने किंवा प्रक्रियेत त्रुटी राहिल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले होते, त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

काही महिलांनी ई-KYC पूर्ण करूनही खात्यात रक्कम जमा न झाल्याने तक्रारी केल्या, तर काही ठिकाणी आंदोलनही झाले. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाने अर्जांची तपासणी सुरू करत, नियमांनुसार पात्र असलेल्या महिलांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार, ज्यांचे तीनही हप्ते थकले होते त्यांना एकरकमी ४,५०० रुपये, तर ज्यांना आधी दोन हप्ते मिळाले आहेत त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता दिला जाणार आहे. तसेच भविष्यात या योजनेतील मासिक मदत १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याबाबतही सकारात्मक संकेत मिळत असून, यामुळे लाडक्या बहिणींना आणखी मोठा आर्थिक आधार मिळण्याची शक्यता आहे.

Comments are closed.