लाडक्या बहिणींना ४५००ची भेट!-₹4,500 Relief for Ladki Bahin!

₹4,500 Relief for Ladki Bahin!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना मकर संक्रांतीपूर्वी दिलासा मिळणार आहे. एकूण तीन हप्त्यांचे ४५०० रुपये जानेवारी १४ पूर्वी खात्यात जमा होण्याचे नियोजन असून, नोव्हेंबरचा हप्ता पुढील आठवड्यात जमा केला जाणार आहे.

₹4,500 Relief for Ladki Bahin!तसेच डिसेंबर व जानेवारीचे उर्वरित ३००० रुपये संक्रांतीपूर्वी देण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे.

या योजनेसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणावर अर्ज प्राप्त झाले होते. सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला पात्र ठरलेल्या लाभार्थींना कागदपत्रांच्या आधारे मदत देण्यात आली. नंतर झालेल्या पडताळणीत निकषांबाहेरील लाभार्थी वगळण्यात आल्याने जिल्ह्याचा मासिक खर्च कमी झाला आहे.

एकाच कुटुंबातील मर्यादेपेक्षा जास्त लाभार्थी, वयोमर्यादा ओलांडलेले, सरकारी नोकरीतील, चारचाकी वाहनधारक तसेच इतर वैयक्तिक लाभ योजनांतील लाभार्थी यांचा लाभ बंद करण्यात आला आहे.

योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य असून सध्या ३१ डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. मात्र निवडणूक प्रक्रियांमुळे या मुदतीला एक महिन्याची वाढ मिळण्याची शक्यता आहे. ई-केवायसी पूर्ण केलेल्या पात्र लाभार्थींनाच फेब्रुवारीपासून दरमहा १० ते १५ तारखेआधी नियमित लाभ मिळणार आहे.

Comments are closed.