नागपुरात ₹15,000 कोटींचा महिंद्रा प्लांट-₹15,000 Cr Mahindra Plant in Nagpur!

₹15,000 Cr Mahindra Plant in Nagpur!

नागपूरमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा भव्य ऑटोमोबाईल प्लांट उभारला जाणार असून त्यासाठी सुमारे ₹15,000 कोटींची गुंतवणूक होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘ॲडव्हांटेज विदर्भ 2026’ औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली.

₹15,000 Cr Mahindra Plant in Nagpur!या प्रकल्पामुळे विदर्भात प्रथमच मोठ्या प्रमाणावर ऑटोमोबाईल उद्योग येत असून, नागपूर, संभाजीनगर व नाशिक हे नवीन औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महिंद्राचा हा प्लांट नागपूरमध्ये सुरू होणार असून, सप्लाय युनिट संभाजीनगरमध्ये उभारले जाणार आहे. 2028 पासून उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील काळात टाटा एरोस्पेसचे सेंटर ऑफ एक्सलन्स, सोलर मॉड्यूल्सची औद्योगिक साखळी, एव्हिएशन स्कूल आणि गडचिरोलीतील विमानतळ यामुळे विदर्भाचा औद्योगिक चेहरा पूर्णतः बदलणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

यासोबतच विदर्भात महाराष्ट्रातील सर्वात मोठा नदीजोड प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भंडाऱ्यातील वैनगंगा नदीला बुलढाण्यातील नळगंगा नदीशी सुमारे 500 किमी लांबीच्या कृत्रिम कालव्याद्वारे जोडण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विदर्भातील सर्व जिल्ह्यांना सिंचन आणि उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध होणार असून, याच वर्षी या योजनेला सुरुवात होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.

Comments are closed.