नवी दिल्लीहून मिळालेल्या माहितीनुसार देशात पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत सुरू आहे. सरकारने पुन्हा स्पष्ट केले की कुठेही इंधनाचा तुटवडा नाही आणि नागरिकांनी घाबरून अनावश्यक बुकिंग करू नये.
घरगुती ग्राहकांसाठी एलपीजी वितरण नियमितपणे चालू असून पॅनिक बुकिंगमध्येही घट झाली आहे. पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर एलपीजी घेऊन येणारी जहाजे देशात दाखल होणार असल्याने पुरवठा आणखी मजबूत होणार आहे.
सरकारच्या माहितीनुसार देशात पुरेसा साठा उपलब्ध असून परिस्थिती नियंत्रणात आहे. काही भागात अफवा पसरल्या होत्या, मात्र प्रशासनाने त्या नियंत्रणात आणल्या असून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीतून येणारी भारतीय जहाजे सुरक्षित असून ती मोठ्या प्रमाणावर एलपीजी घेऊन भारताकडे येत आहेत. त्यामुळे पुढील काळातही इंधन पुरवठा सुरळीत राहणार असल्याचा सरकारचा विश्वास आहे.

Comments are closed.