जि.प.मध्ये १००० नवीन जागा!-ZP to Create 1000 New Posts!

ZP to Create 1000 New Posts!

जिल्हा परिषदेच्या सेवेत काम करताना मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता पुणे जिल्हा परिषदेने एक मोठं पाऊल उचललं आहे. लवकरच तब्बल १००० नवीन पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.

 ZP to Create 1000 New Posts! या पदांमध्ये स्थापत्य अभियंते, परिचारिका (महिला-पुरुष), तसेच लिपिक संवर्गातील काही जागांचा समावेश आहे. नुकत्याच झालेल्या समुपदेशन प्रक्रियेत अनुकंपा तत्त्वावर ५८ जणांना नियुक्ती देण्यात आली. गट ‘क’ व ‘ड’ मधील रिक्त पदांपैकी २० टक्के पदे अनुकंपा भरतीसाठी राखीव ठेवण्यात आली होती.

१५५ पात्र उमेदवारांपैकी १३० जणांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गट ‘क’ मधील १६ व गट ‘ड’ मधील ४२ उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नियुक्ती देण्यात आली.

या वेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, अतिरिक्त सीईओ चंद्रकांत वाघमारे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात उपस्थित होते.

Comments are closed.