जिल्हा परिषदेच्या तारखा जाहिर १० ते २१ जूनदरम्यान परीक्षा होणार | Zilla parishad Exam 2024 Time Table PDF

Zilla parishad Exam 2024 Time Table PDF

0

Zilla parishad Exam 2024 Time Table PDF  जिल्हा परिषदेच्या विविध २५ संवर्गातील पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. याकरिता विविध पदांकरिता टप्प्याटप्प्याने परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परंतु, याचदरम्यान पैसा अंतर्गत असलेल्या जागांबाबत काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने यातील आरोग्यसेवक पुरुष ४० टक्के, आरोग्यसेवक पुरुष ५० टक्के, आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक आदी संवर्गातील पदांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहे..

Examination of candidates in four categories in 21 districts of ‘Non Pesa’

२० संवर्गातील पदांकरिता उमेदवारांनी परीक्षा दिली. यातील रिंगमॅन, वरिष्ठ साहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, आरोग्य पर्यवेक्षक व विस्तार अधिकारी कृपो आदी संवर्गाचे निकाल घोषित करण्यात आले आहे. काही संवर्गातील पदांचे निकाल अद्यापही घोषित न झाल्याने उमेदवारांनी त्याची प्रतीक्षा लागली आहे. त्याचवेळी आरोग्यसेवक पुरुष ४० टक्के, आरोग्यसेवक पुरुष ५० टक्के, आरोग्यसेवक महिला, कंत्राटी ग्रामसेवक व पशुधन पर्यवेक्षक या पदांची परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्याने नॉन पेसामधील उमेदवारांकडून ओरड सुरू होती.

अखेर यावर पर्याय म्हणून नॉन पेसा क्षेत्र असलेल्या सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अकोला, बुलडाणा, वाशीम, औरंगाबाद, बीड, जालना, उस्मनाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोदिया, वर्धा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील चार संवर्गातील ३ लाख ३८ हजार ६२५ उमेदवारांच्या परीक्षा १० ते २१ जूनपर्यंत होणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यात अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

पेसामधील १३ जिल्ह्यांना वगळले

पेसा क्षेत्र असलेल्या ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व चंद्रपूर या अनुसूचित क्षेत्राच्या जिल्ह्यातील परीक्षा मात्र न्यायप्रविष्ट असल्याने यामधून हे १३ जिल्हे वगळण्यात आले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.