शिक्षकांसाठी कडक नियमावली!-Zero Tolerance in Classrooms!

Zero Tolerance in Classrooms!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च महत्त्व देत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक व शाळा कर्मचाऱ्यांसाठी कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर केले आहेत.

Zero Tolerance in Classrooms!विद्यार्थ्यांशी संबंधित कोणतीही गंभीर तक्रार किंवा घटना माध्यमांतून समोर आली, तरी शिक्षणाधिकारी आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ स्वतःहून चौकशी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शाळांमध्ये कोणत्याही प्रकारची शारीरिक शिक्षा किंवा मानसिक छळ यावर पूर्ण बंदी घालण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करणे, कान-कानखेच, केस ओढणे, उठाबशा काढायला लावणे, उन्हात किंवा पावसात उभे ठेवणे, गुडघ्यावर बसवणे, उपाशी ठेवणे किंवा पाणी न देणे यासारख्या कृतींना स्पष्ट मनाई करण्यात आली आहे.

याशिवाय विद्यार्थ्यांचा अपमान करणे, नावं ठेवणे किंवा जात, धर्म, भाषा, लिंग, आर्थिक परिस्थिती, अपंगत्व अथवा अभ्यासाच्या आधारे भेदभाव केल्यास संबंधित शिक्षकांवर कठोर कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Comments are closed.