YCMOU प्रवेशाला मुदतवाढ!-YCMOU Admissions Extended!

YCMOU Admissions Extended!

0

नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या १२ शाखांमधील तब्बल १३८ अभ्यासक्रमांतून प्रवेश घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यात पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अशा विविध स्तरांवरील अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

YCMOU Admissions Extended!या शैक्षणिक वर्षात पारंपरिक अभ्यासक्रमांसोबतच आधुनिक आणि रोजगाराभिमुख नवे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये डेटा अॅनालिटिक्स, IBM सर्टिफिकेट, डिजिटल फोटोग्राफी, श्वानपालन, सौर व पवन ऊर्जा यांसारखे अभ्यासक्रमांचा समावेश आहे. बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना अधिक व्यावसायिक आणि प्रॅक्टिकल शिक्षण मिळावे, हा या अभ्यासक्रमांचा उद्देश आहे.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना एकाचवेळी दोन पदव्या घेण्याची संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना एकाच वेळी पारंपरिक पदवीसोबतच आणखी एक दूरशिक्षणातील पदवी घेता येणार आहे. ही सुविधा विशेषतः करिअरमध्ये स्पर्धात्मकता वाढवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षेचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख १ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. हे अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) प्रवेशासाठी अखेरची नोंदणी २० सप्टेंबरपर्यंत करता येणार असून, त्यानंतर प्रवेशप्रक्रियेत सहभागी होण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.