यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठीच्या प्रवेश प्रक्रियेला १५ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली हाय. विद्यापीठाच्या १२ विद्याशाखांमध्ये एकूण १३५ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत – ज्यामध्ये पदवी, पदव्युत्तर, डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेसचा समावेश हाय.
ज्यांना नोकरी सांभाळत शिक्षण घ्यायचं हाय, किंवा जे नियमित कॉलेजला जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी YCMOU म्हणजे सुवर्णसंधीच. पारंपरिक अभ्यासक्रमांबरोबरच नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमही उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
UGC च्या नव्या नियमानुसार, आता विद्यार्थी एकाच वेळी दोन पदव्या घेऊ शकतात – म्हणजेच नियमित आणि मुक्त विद्यापीठातील शिक्षण एकाच वेळी शक्य झालंय. ह्यामुळे ग्रामीण भागातले आणि काम करणारे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवेश घेतील, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनानं व्यक्त केला हाय.
ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा. जास्त माहिती आणि अपडेट्ससाठी वेबसाइटला भेट देत राहा.

Comments are closed.