यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने (YCMOU) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देत प्रवेशाची नवीन अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ जाहीर केली आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी आणि आपले भवितव्य घडवण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल.

विद्यापीठाच्या १२ विद्याशाखांमध्ये १३५ पदवी, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये पारंपरिक तसेच व्यावसायिक व कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्यामुळे नियमित महाविद्यालयात जाण्यास अडचणी असलेल्या किंवा नोकरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
यंदा विद्यापीठाने नवीन व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुरुवात केली आहे. यामध्ये संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान, कृषीशास्त्र, डेटा अॅनालिटिक्स, IBM सर्टिफिकेट, डिजिटल फोटोग्राफी, शेतकरी उत्पादक कंपनी व्यवस्थापन, श्वानपालक प्रबोधन, सौर व पवन ऊर्जा यासारख्या विषयांचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक उद्योगक्षेत्राच्या मागणीनुसार कौशल्य मिळण्याची संधी आहे.
विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेत आता यूजीसीच्या नव्या नियमांनुसार, विद्यार्थी नियमित पदवीसोबत मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊ शकतात किंवा दोन पदव्यांमध्ये एकाच वेळी प्रवेश घेणे शक्य आहे. यामुळे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी अधिकाधिक विद्यार्थ्यांचा लाभ होईल, असा विश्वास विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या प्रवेश प्रक्रियेत नोकरी करणारे, गृहिणी, व्यवसायिक आणि नियमित महाविद्यालयात जाऊ न शकणारे विद्यार्थी घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेऊ शकतील. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ycmou.digitaluniversity.ac/ किंवा जवळच्या अभ्यास केंद्रातून संपूर्ण माहिती मिळवू शकतात.
विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना सर्व नियम व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया सुलभ व सोपी ठेवण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून पूर्ण माहिती मिळेल याची खात्री केली आहे.
यंदा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे प्रवेश धोरण अधिक विद्यार्थ्यांना लक्षात घेऊन तयार केले गेले आहे. नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम आणि पारंपरिक अभ्यासक्रम यांचा संगम विद्यार्थ्यांना रोजगारक्षम व कौशल्यसमृद्ध बनवेल. विद्यार्थ्यांना घरबसल्या ऑनलाईन शिक्षण घेण्याची संधी असल्याने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी विद्यार्थ्यांनी अर्ज करून आपले शिक्षण सुनिश्चित करावे, असा विद्यापीठ प्रशासनाचा संदेश आहे.

Comments are closed.