महिला प्रवाशांची सुरक्षा! – Women Passenger Safety!

Women Passenger Safety!

महिला प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा म्हणून मध्य रेल्वेने ११७ स्थानकांवर लोकलच्या महिला डब्याजवळ पॅनिक बटण बसवले आहे. आपत्कालीन परिस्थितीत हे बटण दाबल्यास रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि नियंत्रण कक्षाला तत्काळ माहिती मिळेल आणि महिलांना तातडीने मदत मिळेल.

Women Passenger Safety!स्थानकांवर प्रत्येक फलाटावर सीएसएमटी व कल्याण दिशेला प्रत्येकी एक पॅनिक बटण बसवले आहे. महिलांना प्रवासात हे बटण दिसेल आणि ते तातडीने वापरू शकतील.

महिला सुरक्षेबाबत उपस्थित प्रश्नांवर अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ पुरेसे आहे की नाही, याबाबत वारंवार विचारल्यावर RPF कडे मर्यादित मनुष्यबळ असल्याचे कबूल केले. मात्र, स्थानक आणि गाड्यांमध्ये सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा दल व होमगार्डची मदत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

या पॅनिक बटणाद्वारे महिलांना प्रवासात तंत्रज्ञानाच्या मदतीने त्वरित मदत मिळवण्याची संधी मिळणार आहे.

Comments are closed.