महिलांना प्रचारातून रोजगार!-Women Earn via Campaign Work!

Women Earn via Campaign Work!

महापालिका निवडणुकीत गरजू महिलांसाठी प्रचारकाम एक आर्थिक संधी ठरली आहे. सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत महिलांना ३०० रुपये, संध्याकाळी ४ ते रात्री ८ वाजेपर्यंतही ३०० रुपये, तसेच दुपारचे जेवण आणि घरपोच गाडीची सोय मिळत असल्याने महिला सकाळपासूनच प्रचारात सहभागी होत आहेत.

Women Earn via Campaign Work!सकाळी आणि संध्याकाळी काढल्या जाणाऱ्या प्रचारयात्रा व रॅलींमध्ये महिलांचा मोठा सहभाग दिसून येत आहे. ज्या पक्षाकडून जास्त पैसे दिले जातील, त्या पक्षाचे उपरणे गळ्यात घालणे, फोटो किंवा पक्ष चिन्ह असलेले कटआउट घेणे, आणि घोषणा देणे यावर प्राधान्य दिले जात आहे.

काही उमेदवार ४०० रुपये रोजंदारी देत असले तरी ही संख्या फारच कमी आहे. रोजंदारी मिळत असल्यामुळे महिलांनी इतर कामे बाजूला ठेवून प्रचारात जबरदस्त सक्रियता दाखवत आहेत. निवडणुकीच्या शेवटच्या दिवसामुळे ही लगबग आणखी वाढणार आहे, असे चित्र दिसते.

Comments are closed.