नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या Wipro आणि S&P Global यांनी तरुण पदवीधरांसाठी इंटर्नशिपच्या सुवर्णसंधी जाहीर केल्या आहेत. फ्रेशर उमेदवार तसेच 2025 व 2026 मध्ये पदवी पूर्ण करणाऱ्यांसाठी या संधी खुल्या आहेत.
Wipro मध्ये इंटर्न म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक टीम्ससोबत काम करण्याची, व्यावसायिक गरजा समजून घेण्याची आणि प्रत्यक्ष प्रकल्पांवर अनुभव मिळवण्याची संधी मिळणार आहे. नेतृत्व कौशल्य, टीमवर्क आणि वरिष्ठांकडून मार्गदर्शन हा या इंटर्नशिपचा महत्त्वाचा भाग आहे. कामाचे ठिकाण गुरुग्राम आहे.
तर S&P Global कडून समर इंटर्नसाठी भरती होत असून, गणित, संगणकशास्त्र, सांख्यिकी किंवा तत्सम शाखेतील पदवी/पदव्युत्तर शिक्षण घेणारे उमेदवार अर्ज करू शकतात. Python, Machine Learning, GenAI व SQL चे ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. ही संधी देखील गुरुग्राम येथे उपलब्ध आहे.
करिअरची मजबूत सुरुवात करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही इंटर्नशिप मोठी संधी मानली जात आहे.

Comments are closed.