BH नंबर प्लेट म्हणजे नेमके काय? काय असतात तिचे फायदे? कोण घेऊ शकतो हा BH नंबर? वाचा महत्वाची माहिती | Who is eligible for BH series?

Who is eligible for BH series?

0

Who is eligible for BH series? “जेव्हा आपण देशातील दुसऱ्या राज्यात किंवा शहरात स्थलांतरित होता, तेव्हा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागते. ही प्रक्रिया काहीसी कष्टप्रद असते. या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक उपाय केला. या उपायात BH नंबरप्लेट्सचा समावेश होता. या नंबर प्लेट्सला भारत सीरीज नंबर प्लेट्स असेही म्हणतात. हे २०२१ मध्ये सुरू करण्यात आले होते. यामागील उद्देश हा होता की, जे लोक कामानिमित्त वारंवार स्थलांतरित होतात किंवा ज्यांची नोकरी मोबाइल आहे, त्यांच्यासाठी वाहन नोंदणी सुलभ करणे. चला, BH नंबर प्लेट्सच्या फायद्यांबद्दल, पात्रतेबद्दल इत्यादींची माहिती तपशीलवार जाणून घेऊया.”

बीएच नंबर प्लेटवर एक यूनिक रजिस्ट्रेशन क्रमांक असतो. हा संपूर्ण देशभरात खासगी वापराच्या वाहनांसाठी दिला जातो. यामुळे वाहनधारक एकाच नोंदणी क्रमांकाच्या आधारे त्याचं वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेऊ शकतो.ही नंबर प्लेट विम्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर ठरते. या प्रक्रियेचा कारच्या विम्यावर विपरित परिणामही होत नाही. त्याच्या फॉरमॅटविषयी बोलायचं झालं तर, यात ईयर ऑफ रजिस्ट्रेशन अर्थात नोंदणीचं वर्ष (YY),नंतर बीएच मालिका, त्यानंतर चार अंकी नोंदणी क्रमांक आणि अखेरीस XX असं असतं. हे वाहनांची श्रेणी स्पष्ट करतं. उदाहरणार्थ, आपण 22BH9999AA हा क्रमांक पाहू शकता.

या लोकांनाच BH नंबर प्लेट मिळेल

BH नंबर प्लेट फक्त खास लोकांसाठी उपलब्ध आहे. बीएच सीरीज नंबर प्लेट मिळविण्यासाठी पात्रता-

  • राज्य आणि केंद्र सरकारी कर्मचारी
  • संरक्षण क्षेत्रातील कर्मचारी
  • बँक कर्मचारी
  • प्रशासकीय सेवा कर्मचारी
  • चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी कंपन्यांचे कर्मचारी

बीएच सीरिज नंबर प्लेटसाठी अशी करा नोंदणी

बीएच नंबर प्लेट मिळविण्यासाठी वाहनधारकांना या नियमांचे पालन करावे लागेल.

  • MoRTH च्या वाहन पोर्टलवर लॉग इन करा.
  • वाहन पोर्टलवर फॉर्म 20 भरावा लागेल.
  • चारपेक्षा जास्त राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालये असलेल्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फॉर्म 60 सबमिट करावा लागेल आणि कामाच्या प्रमाणपत्रासोबत त्यांचा कर्मचारी आयडी द्यावा लागेल.
  • अर्ज करताना सीरिजच्या प्रकारात ‘BH’ निवडा.
  • आवश्यक कागदपत्रे सबमिट करा, जसे की कार्यरत प्रमाणपत्राची प्रत (फॉर्म 60) किंवा अधिकृत ओळखपत्र.
  • प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) BH सीरिजला मान्यता देईल.
  • शुल्क किंवा मोटार वाहन कराचे ऑनलाइन पेमेंट करा.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वाहन पोर्टल भारतातील सर्व राज्यांमध्ये लागू होणार्‍या रेंडम क्रमाने BH सीरिज नोंदणी क्रमांक तयार करेल.

BH नंबर प्लेट: फायदे आणि तोटे

BH नंबर प्लेट मिळवण्याचे अनेक फायदे आहेत. तुमच्या नोकरीत वारंवार बदल्या होत असतील तर हा पर्याय वापरता येईल. त्यामुळे दुसऱ्या राज्यात जाताना पुनर्नोंदणीचा खर्च वाचतो. तर BH सीरिज संपूर्ण भारतात वैध आहे, त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

बीएच सीरिज नंबर प्लेटसाठीची पात्रता आणि निकष कोणते?

या नंबर प्लेटसाठी राज्य आणि केंद्र सरकारचे कर्मचारी पात्र असतात. या शिवाय संरक्षण विभागाचे कर्मचारी, बँक कर्मचारी, प्रशासकीय सेवा कर्मचारी,पाच पेक्षा जास्त राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यालयं असलेल्या खासगी कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी यासाठी पात्र असतात. वाहन चालकाकडे पीयूसी प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. त्याला वाहनाचा रोड टॅक्स भरावा लागेल. हा नियम केवळ नॉन ट्रान्सपोर्ट वाहनांसाठी लागू असतो

Leave A Reply

Your email address will not be published.