लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता असून महिलांच्या खात्यात तब्बल ₹3000 जमा होऊ शकतात. डिसेंबर महिना संपायला आता अवघे काहीच दिवस उरले असल्याने, दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाण्याची चर्चा जोर धरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्यातच महिलांच्या खात्यात ₹3000 जमा होण्याची शक्यता आहे. नगरपरिषद व नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार असून, त्याआधीच हा निधी खात्यात जमा होऊ शकतो. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे महिलांनी अधिकृत सूचनेकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली आहे. ज्या महिलांनी अद्याप KYC पूर्ण केलेली नाही, त्यांचा लाभ थांबवला जाऊ शकतो. त्यामुळे 31 डिसेंबर 2025 पर्यंत KYC करणे अत्यावश्यक आहे. तसेच, KYC मध्ये काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करण्याची संधीही उपलब्ध असून, महिलांनी संबंधित अधिकृत वेबसाइटवर जाऊन सुधारणा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.