महिला व बालविकासात सरकारी भरती!-WCD Protection Officer Jobs 2025!

WCD Protection Officer Jobs 2025!

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महिला व बालविकास विभाग, पुणे अंतर्गत उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. विभागाकडून संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) – गट क पदांसाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली असून, या माध्यमातून एकूण १७ पदे भरली जाणार आहेत.

WCD Protection Officer Jobs 2025!ही भरती ऑनलाईन पद्धतीने ८ डिसेंबर २०२५ पासून सुरू झाली असून, इच्छुक व पात्र उमेदवारांना २२ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती पुणे जिल्ह्यात केली जाणार आहे.

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक असून, संबंधित क्षेत्रातील अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल. सामान्य प्रवर्गासाठी वयोमर्यादा ३८ वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमांनुसार सवलत लागू राहील.

निवड झालेल्या उमेदवारांना ₹19,900 ते ₹63,200 इतके आकर्षक मासिक वेतन दिले जाणार आहे. निवड प्रक्रिया लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि मुलाखत या टप्प्यांतून पूर्ण होणार आहे. अर्ज फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच स्वीकारले जाणार असल्याने उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा.

Comments are closed.