शिक्षक म्हणून करिअर घडवायचंय? मग ही वेळ तुमच्यासाठीच योग्य आहे! महाराष्ट्रातील इयत्ता १ ते ८वीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना आता टीईटी परीक्षा (Teachers Eligibility Test) देणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही परीक्षा २३ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या काही पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्प अधिकारी नरेश अकुनूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही पदे बाह्यस्त्रोत संस्था — मे. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था, नाशिक — यांच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ३१ ऑक्टोबरपर्यंत https://scmltd.com या संकेतस्थळावर सादर करावेत.
टीईटी परीक्षेचा ताण आणि दिवाळीचा काळ असूनही, शिक्षक बनण्याची इच्छा असलेल्यांसाठी ही भरती एक सुवर्णसंधी ठरणार आहे

Comments are closed.