विद्यापीठांचा संकल्प: विकसित भारत-Varsities for Developed India 2047!

Varsities for Developed India 2047!

“विकसित भारत २०४७” या भव्य ध्येयासाठी राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाने खास पुढाकार घेतला असून, सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.

Varsities for Developed India 2047!हा उपक्रम फक्त शैक्षणिक मर्यादेत न थांबता, सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय आणि प्रशासनिक क्षेत्रातही युवकांना सहभागी करून भारताला २०४७ पर्यंत जागतिक महासत्ता म्हणून उभे करण्याचे ध्येय पुढे नेतो.

या काळात “विकसित भारत संवाद व्याख्यानमाला” घेण्यात येणार असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ञ युवकांशी संवाद साधतील.
रक्तदान शिबिरे, स्वच्छ भारत अभियानातील उपक्रम, पर्यावरण जनजागृती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांवरील व्याख्याने, शहीद भगतसिंह जयंती कार्यक्रम, आरोग्यविषयक कार्यशाळा, तसेच “एक दिन – एक घंटा – एक साथ” ही स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.

युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशांनुसार “स्वच्छता ही सेवा” अभियानही त्याच काळात होणार असून, राज्यभरात NSS युनिट्समार्फत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम पार पडतील.
तसेच, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार Apprenticeship Embedded Degree Programme (AEDP) संदर्भातील कार्यशाळाही विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

Comments are closed.