MPSC सचिवपद रिक्त ! – Vacant MPSC Secretary Post !

Vacant MPSC Secretary Post !

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ही एक घटनात्मक संस्था असून अध्यक्ष आणि सचिव ही तिची दोन कळीची पदे मानली जातात. आयोगाच्या परीक्षा प्रक्रिया, निकाल, शिफारसी, न्यायालयीन बाबी तसेच नवीन नियम अंमलात आणण्याची संपूर्ण जबाबदारी सचिवांकडे असते. कार्यालयीन प्रमुख म्हणूनही सचिवांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

Vacant MPSC Secretary Post !मात्र, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ही जबाबदारी स्वीकारण्याची फारशी तयारी नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून MPSCचे सचिवपद रिक्त आहे. या प्रशासकीय पोकळीचा परिणाम आयोगाच्या कार्यपद्धतीवर होत असून, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आणि चर्चांना उधाण आले आहे.

या पार्श्वभूमीवर MPSCचा कारभार शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यासाठी तुकाराम मुंढे यांची सचिवपदी नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी पुढे येत आहे. या मागणीला सोशल मीडियावर आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे.

तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रात अपरिचित नाही. कठोर प्रशासकीय शिस्त, स्पष्ट निर्णयक्षमता आणि नियमांबाबतची तडजोड न करणारी भूमिका यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. स्थानिक प्रशासनाशी होणारे मतभेद आणि वारंवार बदल्या असूनही, त्यांची ओळख एक कणखर आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून कायम आहे. त्यामुळेच MPSCच्या सुधारणा त्यांच्यामुळे शक्य होतील, असा विश्वास उमेदवार व्यक्त करत आहेत.

Comments are closed.