बॉम्बे हायकोर्ट क्लर्क भरती सुरु – 90 हजार पगाराची संधी, अर्ज करा आजच!

Vacancy in bombay highcourt 2025

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची संधी आहे. बॉम्बे हायकोर्टात क्लर्क पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज प्रक्रिया 22 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. एकूण 129 रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे.

Vacancy in bombay highcourt 2025

या भरतीसाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. तसेच, कायद्याची पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. उमेदवाराकडे GCC-TBC किंवा ITI मान्यताप्राप्त संस्थेचे इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिटाचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्षांपर्यंत असून SC, ST, OBC आणि SBC उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षे आहे. सरकारी किंवा हायकोर्ट कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादेची अट नाही.

या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना ₹29,200 ते ₹92,300 प्रति महिना पगार मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बॉम्बे हायकोर्टाच्या अधिकृत वेबसाइटवर (https://bombayhighcourt.nic.in) जाऊन “News & Events” सेक्शनमध्ये “Applications are invited for the post of Clerk” या लिंकवर क्लिक करावे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संपूर्ण मार्गदर्शक सूचना वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

ही सुवर्णसंधी दवडू नका! सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी त्वरित अर्ज करावा.

Comments are closed.