सरकारी वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसर (गट अ) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर करण्यात आली आहे.

या भरतीत तब्बल १४४० पदे भरली जाणार असून ही नियुक्ती सरळसेवेच्या कोट्यातून केली जाणार आहे. यासाठीची अधिकृत जाहिरात सार्वजनिक आरोग्य विभागाने प्रसिद्ध केली आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी phd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
पात्रता
- उमेदवाराने M.B.B.S. पदवी पूर्ण केलेली असावी.
- वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
वेतन
निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार
₹५६,१०० ते ₹१,७७,५०० इतका पगार मिळणार आहे.
आरक्षण माहिती
- महिलांसाठी: ४३१ जागा
- खेळाडूंसाठी: ७२ जागा
- अनाथांसाठी: १४ जागा
- VJ-NT (अ, ब, क, ड) प्रवर्गासाठी — सध्या शून्य जागा
विशेष टीप
काही प्रवर्गांसाठी सध्या आरक्षण लागू नाही. पुढील टप्प्यात प्रशासनाने आरक्षणाच्या नियमांनुसार योग्य जागा राखणे अपेक्षित आहे.
ही भरती वैद्यकीय पदवीधरांसाठी सरकारी नोकरीत प्रवेशाची सुवर्णसंधी आहे.

Comments are closed.