UPSC ट्रेडमार्क भरती!-UPSC Trademark–GI Recruitment!

UPSC Trademark–GI Recruitment!

सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) महत्त्वाची भरती जाहीर केली आहे. ही निवड प्रक्रिया कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट्स, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क (CGPDTM) विभागाअंतर्गत राबवली जाणार आहे.

UPSC Trademark–GI Recruitment!या भरतीद्वारे एकूण १०२ पदे भरण्यात येणार असून, अर्ज प्रक्रिया १३ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन १ जानेवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. इच्छुक उमेदवारांनी UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

ट्रेडमार्क व भौगोलिक निर्देशांक (GI) परीक्षक पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याची पदवी किंवा समतुल्य पात्रता आवश्यक आहे. वयोमर्यादा १ जानेवारी २०२६ रोजी २१ ते ३५ वर्षे असून, राखीव प्रवर्गांना नियमानुसार सवलत दिली जाणार आहे.

या भरतीमध्ये १०० पदे ट्रेडमार्क–GI परीक्षकांची असून उर्वरित २ पदे उपसंचालक (परीक्षा सुधारणा) या पदासाठी आहेत. बौद्धिक संपदा कायदा आणि प्रशासकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

Comments are closed.