UPSC NDA-I भरती सुरू!-UPSC NDA-I 2026 Applications Open!

UPSC NDA-I 2026 Applications Open!

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी व नौदल अकादमी परीक्षा (NDA/NA-I) 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीतून आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्ससाठी एकूण ३९४ पुरुष व महिला उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

UPSC NDA-I 2026 Applications Open!एनडीएच्या आर्मी शाखेसाठी १२वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, नेव्ही व एअर फोर्स शाखांसाठी भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह १२वी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

सध्या १२वीत शिकणारे विद्यार्थी तात्पुरत्या स्वरूपात अर्ज करू शकतात; मात्र त्यांना १० डिसेंबर २०२६ पर्यंत उत्तीर्णतेचा पुरावा सादर करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क सामान्य व ओबीसी उमेदवारांसाठी १०० रुपये ठेवण्यात आले असून, अनुसूचित जाती-जमाती, महिला उमेदवार आणि संरक्षण सेवेशी संबंधित काही प्रवर्गांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे. या भरतीद्वारे संरक्षण सेवेत जाण्याची सुवर्णसंधी इच्छुक तरुणांसाठी उपलब्ध झाली आहे.

Comments are closed.