स्पर्धा परीक्षा की संधींचा अभाव?-UPSC–MPSC Craze, Few Jobs?

UPSC–MPSC Craze, Few Jobs?

राज्यात एमपीएससी आणि यूपीएससीच्या तयारीकडे तरुणांचा ओघ सातत्याने वाढत असताना प्रत्यक्षात उपलब्ध शासकीय पदांची संख्या किती आहे, याचा सखोल सांख्यिकी अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत भाजपचे मुख्य प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात मांडले.

UPSC–MPSC Craze, Few Jobs?अकोल्यात बोलताना त्यांनी सांगितले की, मोठ्या प्रमाणात पदवीधर विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या तयारीकडे वळत असून अनेक खासगी प्रशिक्षण केंद्रांकडून त्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे.

एमपीएससी आणि यूपीएससी अंतर्गत दरवर्षी नेमकी किती पदे निर्माण होतात, तसेच शासकीय व खासगी प्रशिक्षण संस्थांमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसल्याने धोरणात्मक निर्णय घेणे कठीण होत आहे. त्यामुळे ही माहिती संकलित करून सादर करावी, अन्यथा स्वतंत्र सांख्यिकी अभ्यास हाती घ्यावा, अशी मागणी सावरकर यांनी केली. यावर मंत्र्यांनी यूपीएससीसाठी १०० तर एमपीएससीसाठी ४०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले.

महाज्योती संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण योजनेत मासिक विद्यावेतन बंद करून केवळ ऑनलाइन प्रशिक्षण देण्याच्या निर्णयावरही सावरकर यांनी आक्षेप नोंदवला. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना विद्यावेतन न मिळाल्यास त्यांच्यात नाराजी वाढेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. प्रत्यक्ष मार्गदर्शन व आवश्यक भौतिक सुविधा नसल्यास गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

यावर मंत्री अतुल सावे यांनी महाज्योतीमार्फत यूपीएससी, एमपीएससी, संयुक्त गट ब–क तसेच सैन्यभरतीसाठीचे प्रशिक्षण ऑफलाइन स्वरूपात सुरू असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना विद्यावेतन आणि आकस्मिक निधी देण्याची योजना नियमितपणे सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. काही परीक्षा पूर्णतः ऑनलाइन स्वरूपाच्या असल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार ऑनलाइन प्रशिक्षण प्रस्तावित असून त्यासाठी टॅबलेट व डेटा सुविधा देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सन २०२५–२६ या आर्थिक वर्षात महाज्योती संस्थेसाठी २९९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी १७९.४० कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण संस्था, केंद्रे आणि विद्यार्थ्यांची संख्या याबाबत अद्ययावत सांख्यिकी माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे मत आमदार रणधीर सावरकर यांनी पुन्हा अधोरेखित केले.

दरम्यान, काही प्रेमकथा काळाच्या ओघात विसरल्या जातात, तर काही इतिहासात वेदनादायी ठसे उमटवून जातात. भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी उभी राहिलेली संजय गांधी आणि मनेका गांधी यांची कहाणी अशीच आहे. प्रेमाने सुरू झालेला हा प्रवास सत्ता, अपघात आणि आयुष्यभर न भरून निघणाऱ्या विरहात रूपांतरित झाला. ही केवळ प्रेमकथा नसून, नियतीच्या कठोर वास्तवाची जिवंत साक्ष ठरलेली एक अस्वस्थ करणारी गाथा आहे.

Comments are closed.