युपीएससी मॉक इंटरव्ह्यू ठाण्यात!-UPSC Mock Interviews in Thane!

UPSC Mock Interviews in Thane!

ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत युपीएससी मुख्य परीक्षा 2025 उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दोन दिवसीय मॉक इंटरव्ह्यू सत्र आयोजित केलं जाणार आहे.

UPSC Mock Interviews in Thane!महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी विद्यार्थ्यांना या सत्राचा नक्की फायदा घ्यावा, असं आवाहन केलंय.

यंदाची युपीएससी पूर्व परीक्षा 25 मे रोजी झाली आणि मुख्य परीक्षा ऑगस्टमध्ये पार पडली. मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आता अंतिम मुलाखतीसाठी पात्र ठरले असून त्यांच्या तयारीसाठी हे मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आलंय.

मॉक इंटरव्ह्यू पॅनलमध्ये कार्यरत व निवृत्त आयएएस, आयपीएस, आयआरएस अधिकारी, तज्ज्ञ मार्गदर्शक आणि वरिष्ठ पत्रकार सहभागी होणार आहेत.

विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी आपलं DAF-II अप्लिकेशन cd*********@***********ov.in या ई-मेलवर पाठवायचं आहे. दिलेल्या माहितीचं विश्लेषण करून मुलाखत वेळ ठरवली जाणार आहे.

तसंच, 28 नोव्हेंबरपर्यंत नावनोंदणीसाठी खालील लिंकवर फॉर्म भरायचा आहे —
https://forms.gle/o2KDHWsNZNeqdn6X9

अधिक माहितीसाठी संस्था दूरध्वनी क्रमांक 25881421 वर संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Comments are closed.