यूपीएससी वेळापत्रक जाहीर!-UPSC Mains Schedule Out!

UPSC Mains Schedule Out!

पुण्यातून एक महत्त्वाची बातमी! यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा मुख्य परीक्षा 2025चं वेळापत्रक अखेर जाहीर केलंय. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनं कान टवकारून ऐका – मुख्य परीक्षा येत्या 22 ते 31 ऑगस्ट दरम्यान दोन सत्रांत घेतली जाणार आहे.

UPSC Mains Schedule Out!या परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. सकाळचं सत्र 9 ते 12, आणि दुपारचं सत्र 2:30 ते 5:30 यावेळेत होणार आहे.

यंदा एकूण 979 पदांसाठी भरती होणार असून, यामध्ये IAS – 180, IPS – 150, IFS – 55, व अन्य सेवांच्या पदांचा समावेश आहे. पूर्व परीक्षेतून निवडलेले 14,161 उमेदवार मुख्य परीक्षेला बसणार आहेत – म्हणजे जागांपेक्षा तब्बल 12-14 पट स्पर्धा!

मुख्य परीक्षेत एकूण 9 वर्णनात्मक पेपर्स असणार आहेत. त्यापैकी दोन पेपर्स (इंग्रजी आणि एक भारतीय भाषा) पात्रता स्वरूपाचे असतील. उरलेले सात पेपर्स (4 सामान्य अध्ययन, 1 निबंध, 2 पर्यायी) गुणवत्तेसाठी मोजले जाणार.

Comments are closed.