UPSC मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ३४९ सहाय्यक कमांडंट पदांची भरती; अर्जाची अंतिम मुदत १२ मार्च २०२६! | UPSC CAPF Recruitment 2026: 349 Posts!

UPSC CAPF Recruitment 2026: 349 Posts!

केंद्रीय लोकसेवा आयोग (Union Public Service Commission) यांनी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतर्गत (Central Armed Police Forces) सहाय्यक कमांडंट (गट अ) पदांच्या एकूण ३४९ रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ मार्च २०२६ आहे. देशसेवेची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

UPSC CAPF Recruitment 2026: 349 Posts!

या भरती मोहिमेत सीमा सुरक्षा बल (Border Security Force) – १०८ पदे, केंद्रीय राखीव पोलीस बल (Central Reserve Police Force) – १०६ पदे, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (Central Industrial Security Force) – ७० पदे, सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal) – ५३ पदे आणि भारत-तिब्बत सीमा पोलीस (Indo-Tibetan Border Police) – १२ पदांचा समावेश आहे.

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. १ ऑगस्ट २०२६ रोजी उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. शासन नियमांनुसार अनुसूचित जाती/जमाती (SC/ST) प्रवर्गातील उमेदवारांना ५ वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC) उमेदवारांना ३ वर्षांची वयोमर्यादा सवलत देण्यात येणार आहे. खुला प्रवर्ग व ओबीसी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क २०० रुपये निश्चित करण्यात आले असून, एससी/एसटी उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

देशाच्या सुरक्षेसाठी जबाबदारीची भूमिका बजावण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया एक महत्त्वपूर्ण संधी असून, पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.