शाळा बंदला संघटनेचा नकार!-Union Rejects School Strike!

Union Rejects School Strike!

राज्यातील ५ डिसेंबरला होणाऱ्या शाळा बंद आंदोलनाला मध्यवर्ती शिक्षक संघटनेने ठाम नकार दिला आहे. या आंदोलनात संघटनेशी जोडलेल्या कोणत्याही घटक संघटनेने सहभागी व्हायचे नाही, अशी स्पष्ट भूमिका संघटनेचे अध्यक्ष केशवराव जाधव यांनी जाहीर केली. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि चुकीचे समज पसरू नयेत, यासाठी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे.

Union Rejects School Strike!सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आता अनिवार्य झाले आहे. तसेच जुनी पेन्शन योजना, शिक्षकेतर पदभरती यांसाठी अनेक संघटनांनी एकत्र येऊन ५ डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन जाहीर केले. परंतु मध्यवर्ती शिक्षक संघटनेने या आंदोलनापासून स्वतःला दूर ठेवले आहे.

मुख्याध्यापक महासंघ, शिक्षकेतर कर्मचारी संघटना आदी काही संघटना आंदोलनात उतरणार असल्या तरी सर्व शिक्षक संघटना सहभागी आहेत, असा गैरसमज काही ठिकाणी पसरवला जात असल्याची भीती संघटनेने व्यक्त केली आहे. संघटनेने स्पष्ट केले की त्यांच्या एकही घटक संघटनेने आंदोलनात उतरू नये.

टीईटीची अनिवार्यता रद्द करणे आणि संच मान्यतेच्या धोरणात बदल करणे या प्रमुख मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी ९ नोव्हेंबरला राज्यभर मुक मोर्चे काढले होते व २४ नोव्हेंबरला जंतर-मंतर येथे आंदोलन केले होते. मात्र शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे नुकसान करणे चुकीचे असल्याचे संघटनेचे मत आहे.

त्यामुळे ५ डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाला पाठिंबा नसला तरी येत्या हिवाळी अधिवेशनात टीईटीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय मध्यवर्ती शिक्षक संघटनेने घेतला आहे.

Comments are closed.