एकत्रित CET: मोठा बदल!-Unified CET: Big Shift!

Unified CET: Big Shift!

सीईटी सेलनं यंदा मोठा फेरबदल करत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय. हॉटेल मॅनेजमेंट, बीबीए, बीएमएस, बीसीए अशा अभ्यासक्रमांसाठी आतापर्यंत दोन वेगवेगळ्या सीईटी परीक्षा घेतल्या जायच्या. पण आता २०२६–२७ या शैक्षणिक वर्षापासून या सगळ्या अभ्यासक्रमांसाठी एकत्रित सीईटी घेण्याचं ठरलयं.

Unified CET: Big Shift!व्यवस्थापनशास्त्र (बीबीए, बीएमएस, बीबीएम), संगणकशास्त्र (बीसीए) आणि हॉटेल मॅनेजमेंट (बीएमएमसीटी) या अभ्यासक्रमांसाठी एकच ‘एमएएच–बी.एचएमसीटी/बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम सीईटी २०२६’ नावाची संयुक्त परीक्षा होणार आहे. ही पहिली संयुक्त परीक्षा २८ ते ३० एप्रिल या कालावधीत पार पडेल, अशी माहिती आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी प्रसिद्धिपत्रकात दिली.

राज्यातील व्यवस्थापन व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकात इतर अनेक परीक्षांच्या तारखा निश्चित केल्या आहेत. एमबीए–एमएमएसची पहिली परीक्षा ६ ते ८ एप्रिल, तर दुसरी ९ मे रोजी आयोजित केली जाईल. गेल्या वर्षी तब्बल १.३८ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

इतर अभ्यासक्रमांसाठी—

  • एमसीए सीईटी: ३० मार्च
  • ३ वर्षांचा कायदा अभ्यासक्रम: १ व २ एप्रिल
  • ५ वर्षांचा कायदा अभ्यासक्रम: ८ मे
  • नर्सिंग सीईटी: ६ व ७ मे
  • बीएड सीईटी: २७ ते २९ मार्च
  • बीपीएड: ४ एप्रिल

जसं राष्ट्रीय स्तरावर ‘जेईई मेन्स’ वर्षातून दोनदा घेतली जाते, तसेच विद्यार्थी वर्गाला अधिक संधी मिळावी म्हणून यंदापासून एमएचटी–सीईटी आणि एमबीए सीईटी दोन वेळा घेण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.

प्रवेशासाठी पहिली परीक्षा देणं बंधनकारक, तर दुसरी परीक्षा ऐच्छिक असेल. विद्यार्थी दोन्ही परीक्षा दिल्यास, ज्या परीक्षेत जास्त गुण मिळतील तेच प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, असं सीईटी सेलने स्पष्ट केलंय.

Comments are closed.