राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने महत्त्वाचा निर्णय घेत, बी.एचएमसीटी, बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या पदवी अभ्यासक्रमांसाठी आता एकच सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याची घोषणा केली आहे.

२०२६–२७ या शैक्षणिक वर्षासाठी या अभ्यासक्रमांसाठी दोन स्वतंत्र CET परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी एकच CET ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, MAH-BHMCT/BCA/BBA/BMS/BBM CET 2026 साठी परीक्षा कालावधी १२० मिनिटे असेल. सर्व अभ्यासक्रमांसाठी एकत्रित प्रश्नपत्रिका आणि एकसमान परीक्षा पद्धती असणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच तयारीवर अनेक अभ्यासक्रमांसाठी अर्ज करता येणार आहे.
राज्य CET कक्षाने या परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. उमेदवार, पालक आणि सहभागी शैक्षणिक संस्थांनी या बदलाची नोंद घेऊन त्यांच्या नियोजनात सुधारणा कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. हा निर्णय प्रवेश प्रक्रिया अधिक पारदर्शक, सोपी व विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठरणार आहे.

Comments are closed.