भारतामध्ये शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोठी सुवर्णसंधी आली आहे. UGC NET JRF 2025 परीक्षा पास केल्यास उमेदवाराला कोणतीही नोकरी न करता दरमहा सरकारकडून ₹37,000 ते ₹42,000 इतकी फेलोशिप मिळते. म्हणजेच, पाच वर्षांत ₹24 लाखांहून अधिक स्टायपेंड फक्त शिक्षण आणि संशोधनासाठी दिला जातो.

यूजीसी म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) दरवर्षी National Eligibility Test (NET) ही परीक्षा आयोजित करतो. ही परीक्षा पास झाल्यानंतर उमेदवाराला कॉलेज किंवा विद्यापीठात प्राध्यापक, असिस्टंट प्रोफेसर म्हणून अर्ज करण्याची संधी मिळते. पण जर उमेदवार JRF (Junior Research Fellowship) साठी पात्र ठरला, तर त्याला सरकारकडून संशोधनासाठी दरमहा आर्थिक मदत मिळते.
२० सप्टेंबर २०२३ रोजी झालेल्या यूजीसीच्या बैठकीत फेलोशिप रकमेची वाढ करण्यात आली. आता JRF साठी पहिले दोन वर्षे दरमहा ₹37,000 आणि पुढील तीन वर्षांसाठी SRF (Senior Research Fellowship) साठी ₹42,000 इतकी रक्कम मिळते. याशिवाय, विद्यार्थ्यांना दरवर्षी कंटीजन्सी ग्रँट म्हणून अतिरिक्त आर्थिक सहाय्य दिले जाते — मानविकी शाखेसाठी JRF साठी ₹10,000, SRF साठी ₹20,500 आणि विज्ञान शाखेसाठी JRF साठी ₹12,000, SRF साठी ₹25,000.
UGC NET डिसेंबर 2025 परीक्षा 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 या कालावधीत कंप्युटर बेस्ड टेस्ट (CBT) पद्धतीने देशभर आयोजित केली जाणार आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in वर जाऊन अर्ज भरावा. अर्ज प्रक्रिया सोपी आहे — वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा, फॉर्म भरा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि ऑनलाइन फी भरून अर्ज सबमिट करा.
फी रचना पुढीलप्रमाणे आहे: General साठी ₹1150, OBC-NCL/EWS साठी ₹600 आणि SC/ST/दिव्यांग/ट्रान्सजेंडर उमेदवारांसाठी ₹325. फी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI द्वारे भरता येते.
या फेलोशिपचे फायदेही मोठे आहेत — दरमहा उच्च फेलोशिप रक्कम, संशोधनासाठी स्वतंत्र ग्रँट, PSU (ONGC, BHEL इत्यादी) मध्ये NET स्कोअरच्या आधारे नोकरीच्या संधी, तसेच शिक्षण क्षेत्रात प्रतिष्ठेचे स्थान. त्यामुळे, संशोधनाची आवड आणि शैक्षणिक प्रगती साधायची असेल, तर UGC NET JRF 2025 ही परीक्षा तुमच्यासाठी एक उत्तम पायरी ठरू शकते.

Comments are closed.