UGCची 22 बनावट विद्यापीठांची यादी!-UGC Flags 22 Fake Universities!

UGC Flags 22 Fake Universities!

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या बनावट उच्चशिक्षण संस्थांवर यूजीसीने पुन्हा एकदा करडी कारवाई केली आहे. देशभरातील फसव्या आणि मान्यता नसलेल्या एकूण २२ बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील ‘राजा अरेबिक युनिव्हर्सिटी’चाही समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.

UGC Flags 22 Fake Universities!अशा प्रकारच्या संस्थांकडून कोणतीही मान्यता नसताना ‘विद्यापीठ’ हा शब्द वापरून विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात येत आहेत. यूजीसी कायदा 1956 नुसार, मान्यता नसताना ‘युनिव्हर्सिटी’ हा शब्द वापरणे हा गुन्हा आहे. तरीही अनेक राज्यांमध्ये या फसव्या संस्थांचा गोरखधंदा उघडपणे सुरू असल्याचे दिसते.

यूजीसीने प्रत्येक राज्य सरकारला कठोर कारवाईचे निर्देश दिले असले तरी अनेक ठिकाणी याकडे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, विद्यार्थ्यांची दिशाभूल होत राहते आणि त्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान वाढते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

यंदाच्या यादीत दिल्लीमध्ये सर्वाधिक 10, तर उत्तर प्रदेशात 4 बोगस विद्यापीठे आढळली आहेत. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये अशा संस्थांची यादी प्रसिद्ध करून यूजीसी विद्यार्थी आणि पालकांना जागृत करण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून कोणीही अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये

Comments are closed.