अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं आता प्राध्यापक भरतीत मोठा आवाज उठवला आहे. बरंच वर्षं रखडलेली ही भरती प्रक्रिया आता मार्गी लागावी, असं ‘अभाविप’चं ठाम मत आहे.
मात्र, भरतीत ‘७५:२५’ चं सूत्र लागू न करता, ‘युजीसीनं’ मान्यता दिलेलं ‘५०:५०’चं सूत्र लागू करावं, अशी मागणी परिषदेनं केलीये. शैक्षणिक पात्रतेच्या मानांकन पद्धतीत होणारा अन्यायही दूर व्हावा, अशीही सूचना करण्यात आलीये.
विद्यापीठांमधली प्राध्यापक भरती दहा-बारा वर्षांपासून थांबलेली असली तरी, आता काही विद्यापीठांच्या जाहिरातींमधून प्रक्रिया सुरू होतानाच दिसतेय. पण, राज्य सरकारनं ६ ऑक्टोबरला काढलेल्या ‘जीआर’मधल्या अटी ‘युजीसी’च्या मार्गदर्शक तत्त्वांशी जुळत नाहीत, असं अभाविपनं म्हटलं आहे.
मुलाखतीसाठी ७५:२५ हे प्रमाण अन्यायकारक असल्याचं सांगत, ५०:५० सूत्र लागू करून भरती पारदर्शक पद्धतीनं व्हावी, अशी मागणी विदर्भ प्रांतमंत्री पायल किनाके यांनी केली आहे.
‘युजीसी’च्या नियमानुसार, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्जदारानं ‘सेट-नेट’ परीक्षा उत्तीर्ण केलेली किंवा ‘पीएच.डी.’ मिळवलेली असावी, हे स्पष्ट नमूद आहे.

Comments are closed.