टायपिंग परीक्षा 2025! – टायपिंग परीक्षा 2025!

Typing Exam 2025!

0

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परिक्षा (GCC-TBC) ११ जून २०२५ पासून मराठी, हिंदी आणि इंग्रजी (३० व ४० शब्द प्रति मिनिट) या भाषांमध्ये घेण्यात येणार हाय. या परिक्षा राज्यातील १७५ परीक्षा केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीनं पार पडणार हाय.

Typing Exam 2025!

प्रवेशपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू:
परिषदेकडून परिक्षेची प्रवेशपत्रं www.mscepune.in या संकेतस्थळावर संस्था लॉगिनद्वारे उपलब्ध करून देण्यात आलीय. संगणक टंकलेखन संस्थाचालकांनी त्यांच्या संस्थेतील सगळ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं डाउनलोड करून, त्यावर विद्यार्थ्यांचा नवीन फोटो, संस्थेचा शिक्का आणि स्वाक्षरीसह त्वरीत वितरित करावं, असं आवाहन केलं गेलंय.

नाव व बदलाबाबत सूचना:
एकदा प्रवेशपत्र वितरित झाल्यावर विद्यार्थ्यांचं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, पतीचं नाव, आईचं नाव, विषय बदल, फोटो बदल यासारख्या कोणत्याही बदलाला परवानगी नसाय. फक्त स्पेलिंग दुरुस्ती आवश्यक असल्यास, आणि तीही नावामध्ये बदल न करता, त्यासाठी २०० रुपयांचा शुल्क भरून www.mscepune.in या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाईन लिंकद्वारे सुधारणा करता येईल.

महत्त्वाची सूचना:
सर्व विद्यार्थ्यांनी आपली प्रवेशपत्रं परिक्षेच्या आधीच संगणक टंकलेखन संस्थेतून घेऊन ठेवावी. एकदा परिक्षा सुरू झाल्यावर कोणतीही दुरुस्ती मान्य केली जाणार नाही, असं परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलंय.

तयारी करा आणि यशस्वी व्हा!
विद्यार्थ्यांनी वेळेवर प्रवेशपत्र मिळवून, आवश्यक बदल पूर्ण करून परिक्षेच्या दिवशी कोणताही त्रास होणार नाही याची खात्री करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.