५८५ रुपयांत वर्षभर फ्री एसटी प्रवास!-Travel Free All Year for Just ₹585!

Travel Free All Year for Just ₹585!

राज्य मार्ग परिवहन महामंडळानं (MSRTC) आपल्या वयोवृद्ध नागरिकांसाठी भारीच योजना काढलीय रे! आता फक्त ५८५ रुपयांत वर्षभर सगळ्या महाराष्ट्रात एसटीनं हवे तिकडे प्रवास करता येणार – आणि तोही फुकटात!

Travel Free All Year for Just ₹585!या भन्नाट योजनेचं नाव ठेवलंय — ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’.
ही योजना खास ७५ वर्षांहून जास्त वयाच्या आजी-आजोबांसाठी आहे. यासाठी फक्त ५८५ रुपये देऊन एक ‘स्मार्ट कार्ड’ घ्यायचं. एकदा हे कार्ड घेतलं की मग, शिवशाही, शिवनेरी, साधी एसटी — काहीही म्हणा, सगळ्यांत अमर्याद प्रवास!

कागदपत्रं:
स्मार्ट कार्ड काढताना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा कुठलाही वैध फोटो आयडी चालतो. ही प्रक्रिया एसटी आगारात किंवा ऑनलाइन दोन्ही ठिकाणी करता येते.

या योजनेमागचा उद्देश पण भारीच आहे — ज्येष्ठ नागरिकांना सन्मानानं आणि सवलतीत प्रवासाचा आनंद देता यावा.
महामंडळानं आधी महिलांसाठी अर्ध तिकीट सवलत दिली होतीच, आता या योजनेमुळे वयोवृद्धांनाही मोठा दिलासा मिळालाय.

स्थानिक मंडळं आणि सामाजिक संस्थांनीही म्हटलंय —
“एसटी ही खऱ्या अर्थानं जनतेची गाडी आहे, आणि आता ती ज्येष्ठ नागरिकांची ‘जीवनवाहिनी’ बनलीय!”

Comments are closed.