बदली प्रमाणपत्रांची तपासणी!-Transfer Certificate Check!

Transfer Certificate Check!

जिल्हा परिषदेच्या शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी दिव्यांग किंवा गंभीर आजारी असल्याचे प्रमाणपत्र दिलं आहे. पण काही प्रमाणपत्रे खोटी असल्याच्या तक्रारींमुळे शासनाने या प्रमाणपत्रांची कडक फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Transfer Certificate Check!जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्या सूचना नुसार, सुमारे ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी होणार आहे. दिव्यांग किंवा आजारी असल्याचा दावा करणाऱ्या शिक्षकांची वैद्यकीय पडताळणी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांकडून करायची आहे.

२०१८ पासून संवर्गानुसार ऑनलाईन बदली सुरू आहे. संवर्ग एक मध्ये पक्षाघात, दिव्यांग, गंभीर आजारी, घटस्फोटित महिला अशा शिक्षकांना प्राधान्य दिले जाते. मात्र काही शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्रे सादर करून बदलीचा फायदाच घेतल्याचे तक्रारींमुळे उघडकीस आले.

संशयास्पद प्रमाणपत्रांवर शल्य चिकित्सकांच्या कडक तपासणीचे आदेश आहेत. दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये अनियमितता आढळल्यास फौजदारी गुन्हे दाखल होऊ शकतात. तसेच, दोषी शिक्षकांना निलंबित करुन शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेशही ग्रामविकास विभागाने दिले आहेत.

Comments are closed.