तीन भाऊ, एक स्वप् एमपीएससी यश!-Three Brothers, One MPSC Triumph!

Three Brothers, One MPSC Triumph!

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील उखलगाव या छोट्याशा गावातून आलेल्या चंदन कुटुंबाने महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं यश मिळवलं आहे.

Three Brothers, One MPSC Triumph!या कुटुंबातील तिघे सख्खे भाऊ जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत दाखल झाले आहेत, जे राज्यातील दुर्मिळ आणि प्रेरणादायी उदाहरण मानले जात आहे.

दिलीप मालन चंदन हे नागपूर गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत, विजय मालन चंदन पुण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावत आहेत, तर सर्वात धाकटा अजय मालन चंदन याची नुकतीच एमपीएससीमार्फत राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झालेला त्यांचा शैक्षणिक प्रवास पुण्यातील पदवी शिक्षणापर्यंत पोहोचला आणि मोठ्या भावांच्या प्रेरणेतून अजयनेही एमपीएससीचे स्वप्न साकार केले.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी चंदन बंधूंची ही यशोगाथा आज प्रेरणेचा दीप ठरत आहे.

Comments are closed.