ठाणे मनपाच्या शाळांमध्ये ‘थिंक बिग स्पेसेस’ डिजिटल शिक्षणाची नवी क्रांती! | Think Big Wave in Thane Schools!

Think Big Wave in Thane Schools!

ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची सर्जनशीलता, कल्पकता आणि कौशल्ये विकसित करण्यासाठी ‘थिंक बिग स्पेसेस’ हा विशेष डिजिटल शिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाणे मनपा शिक्षण विभाग, पाय जाम फाउंडेशन आणि अमेझॉन यांच्या संयुक्त उपक्रमातून येऊर येथील मनपा शाळा क्र. ६५ मध्ये या प्रकल्पाचे पहिले केंद्र उद्घाटन झाले.

Think Big Wave in Thane Schools!

या वेळी उपायुक्त सचिन सांगळे, AWS चे संचालक कॅमेरॉन इव्हान्स आणि पाय जाम फाउंडेशनचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शोएब दार उपस्थित होते.

या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना पारंपरिक पाठांतरापेक्षा प्रत्यक्ष प्रयोग, समस्या सोडविणे, कोडिंग, STEM कॉर्नर्स आणि डिझाइन थिंकिंग यांचा वास्तविक अनुभव देणे हा आहे. या माध्यमातून मनपाच्या नऊ शाळांमधील ९०० हून अधिक विद्यार्थी थेट डिजिटल कौशल्यांचा लाभ घेणार आहेत.

विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांच्या कौशल्यवृद्धीलाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. आयसीटी आणि इतर विषयांतील २५० शिक्षकांना सर्वसमावेशक डिजिटल प्रशिक्षण दिले जात असून, याचा लाभ मनपाच्या ५५ शासकीय शाळांमधील सुमारे ७,५०० विद्यार्थ्यांना मिळणार आहे. हा उपक्रम ठाण्यातील सरकारी शिक्षण व्यवस्थेला अधिक आधुनिक, सृजनशील आणि तांत्रिकतेशी जुळवून घेणारा ठरणार आहे.

Comments are closed.