सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) सक्तीच्या निर्णयामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त होत आहे. शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे की, या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावून अनेक शिक्षकांवर अनावश्यक कारवाई केली जात आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्य सरकारकडे मागणी केली आहे की, या निर्णयावर तातडीने पुनर्विचार याचिका दाखल करून तो मुद्दा पुन्हा न्यायालयासमोर ठेवावा. अन्यथा २४ नोव्हेंबर रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेचे नेते संभाजीराव थोरात यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला राज्याध्यक्ष सचिन डिंबळे, उदय शिंदे, जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, शिवाजी खांडेकर, तसेच विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिक्षक संघटनांचा ठाम आग्रह आहे की, सरकारने न्यायालयाच्या आदेशाचा अतिरेकी अर्थ न लावता, अनुभवी शिक्षकांचे हित जपावे आणि टीईटी सक्तीबाबत तातडीने स्पष्टता आणावी, अन्यथा शिक्षकवर्ग रस्त्यावर उतरेल.

Comments are closed.