जळगाव जिल्ह्यात टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या पदोन्नतीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून टीईटी पात्र शिक्षकांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या निर्णयामुळे काही शिक्षकांमध्ये असंतोष पसरला असून, आपल्यावर अन्याय होत असल्याचा दावा संबंधित शिक्षकांकडून केला जात आहे. टीईटी परीक्षा पदोन्नतीसाठी अनिवार्य करणे योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
या प्रकरणाविरोधात काही शिक्षकांनी उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सुरू असलेली पदोन्नती प्रक्रिया सध्या कायदेशीर अडचणीत सापडली आहे.
आता या संपूर्ण प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असून, त्याचा परिणाम राज्यातील हजारो शिक्षकांच्या पदोन्नतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.