टीईटीमध्ये पुन्हा पेपरफुटीचा धक्का – ९ जणांना अटक! | TET Paper Leak Shock – 9 Arrested!

राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या शिक्षक TET पात्रता परीक्षेत पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रयत्न उघडकीस आला आहे. रविवारी घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा पेपर फोडण्याची तयारी करत असलेल्या टोळीचा मुरगुड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने पर्दाफाश केला असून ९ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

TET Paper Leak Shock – 9 Arrested!

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २३ नोव्हेंबरला घेण्यात आलेली परीक्षा देशभरात सुरळीत पार पडली असली, तरी या घटनेमुळे परीक्षेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी टोळी परीक्षेचा पेपर लीक करण्याच्या तयारीत होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या प्रकरणातील आरोपींचा नेटवर्क मोठा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, घटनेचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील सोनगे येथून ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी काही जण स्वतः परीक्षेला बसलेले शिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे.

राज्यभरातील लाखो उमेदवार परीक्षा देत असताना, कोल्हापूरमध्ये घडलेल्या या प्रयत्नामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पोलीस रात्रीभर तपास करत असून, आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments are closed.