शिक्षक पदावर काम करत असलेल्या सगळ्या शिक्षकांना आता टीईटी (TET) पास होणं अनिवार्य केलंय. सुप्रीम कोर्टानं थेट सांगितलं की, जर नोकरीत टिकून राहायचं असेल किंवा पदोन्नती हवी असेल, तर टीईटी पास करणं आलंच!
2009 च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार, शिक्षक पात्रता परीक्षा ही गरजेची आहे. एनसीटीईनं 2010 मध्ये टीईटी अनिवार्य केली होती आणि पास होण्यासाठी 5 वर्षांची मुभा दिली होती – ती नंतर 4 वर्षांनी वाढवली गेली.
पण आता कोर्टानं स्पष्ट केलंय की, जर 5 वर्षांपेक्षा जास्त सेवा केली असेल आणि टीईटी पास नाही, तर नोकरी सोडावी लागेल किंवा जबरदस्तीने निवृत्त व्हावं लागेल.
तमिळनाडू आणि महाराष्ट्रातल्या शिक्षक याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हे स्पष्ट आदेश दिलेत. अल्पसंख्याक संस्थांवर हे लागू होईल की नाही, हे पुढचं खंडपीठ ठरवणार आहे.

Comments are closed.